भगतसिंह कोश्यारी हे RSS चे एजंट आहेत. चुकीचा इतिहास सांगून त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला..! - संभाजी ब्रिगेड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 28, 2022

भगतसिंह कोश्यारी हे RSS चे एजंट आहेत. चुकीचा इतिहास सांगून त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला..! - संभाजी ब्रिगेड

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे RSS चे एजंट आहेत. चुकीचा इतिहास सांगून त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला... - संभाजी ब्रिगेड

काळ्या टोपीच्या खाली विकृतीचा इतिहास दडलेला आहे. संघाची काळी टोपी घालून भगतसिंग कोशारी हे छत्रपतींचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करत आहेत. खोटा इतिहास सांगत आहेत. त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे... छत्रपती शिवाजी महाराजांचे 'गुरु' राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आहेत, संत रामदास नाहीत. म्हणून शालेय पाठ्यपुस्तकातून सुद्धा रामदास गुरू असल्याचा खोटा इतिहास तात्काळ हटवला पाहिजे.

मासा पाणी खेळे, गुरु कोण असे त्याचा...'!!

घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ति खोडसाळपणे इतिहासाचे उदात्तीकरण करणार असेल तर शिवप्रेमी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. 'कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवले पाहिजे...' त्यासाठी संभाजी ब्रिगेड राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. ते व्यवस्थित राज्य चालू शकत नाहीत ते बेताल वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ते संघाचा एजंडा हे ऐजंट सारखा राबवत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे RSS चे एजंट आहेत. चुकीचा इतिहास सांगून त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे 'गुरु' राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. संत रामदास नाहीत. त्यांची कधीही भेट सुद्धा झालेली नाही. इतिहासात देखील त्यांच्या भेटीचा तत्कालिन ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही. मात्र वारंवार खोटा इतिहास लिहिला आणि शालेय पाठ्यपुस्तकात सांगितला व शिकवला जातो. संत रामदास हे शिवरायांचे गुरू नाहीत हे आम्ही २० वर्षापासून पुराव्यासह सांगत आहोत. *'मा. उच्च न्यायालयाने सुद्धा 'गुरु' नसल्याचा निकाल दिलेला आहे. आणि जर खोटा इतिहास सांगण्याचा लिहिण्याचा किंवा छापण्याचा प्रयत्न केला तर हा कोर्टाचा अवमान होईल. तसेच अवमान करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट आदेश आहे.'* आता शालेय पाठ्यपुस्तकातून रामदास व यांचा खोटा इतिहास तात्काळ काढून टाकावा... चल रे बाबा अशा पुस्तकांवर सुद्धा बंदी घालण्यात यावी. राज्यपाल कोशारी यांनी खोटा इतिहास सांगून महाराष्ट्राची दिशाभूल करू नये... तसेच राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज व संत रामदास यांचे पुतळे व फोटो काढून टाकावेत... अशी संभाजी ब्रिगेड' ची राज्य सरकारकडे मागणी आहे.

राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील खऱ्या व चांगल्या 12 शिवचरित्रावर आधारित खरी पुस्तके वाचावीत. महाराष्ट्राचा खरा इतिहास समजून घ्यावा. राज्य संघाचा (RSS) अजेंडा राबवू नये.

महाविकास आघडी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना राज्यपाल भगसिंग कोश्यारी विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील बरेच नगरसेवक रामदासाचे भक्त आहेत. त्यांनी अगोदर घरातील रामदास फोटो काढून टाकावा... 
- संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.
9850842703

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages