RSS च्या भगतसिंग कोसारीनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

RSS च्या भगतसिंग कोसारीनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला..!


RSS च्या भगतसिंग कोसारीनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला..!

औरंगाबाद (कटूसत्य वृत्त):- राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल औरंगाबाद मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
समर्थ नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं का? असं वक्तव्य भगतसिंग कोसारीनी औरंगाबाद मधील कार्यक्रमात केले आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांना छोट लेखतोय अस नाही ज्याला गुरु नाही तर त्या माणसाची महत्ती उरत नाही. असंही ते म्हणाले समर्थ रामदासांच्या कृपेने आम्हाला राज्य मिळाला अस शिवाजी महाराज म्हणाले होते त्याचबरोबर गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो असेही शिवाजी महाराज समर्थ रामदासांना म्हणाले होते असं सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोसारी म्हणाले.

भगतसिंग कोसारीनी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा

भगतसिंग कोसारीनी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार अस आ.अमोल मिटकरी म्हणाले. असे बोलून राज्यपाल महोदयांनी औरंगाबाद खंडपीठाचा अवमान केला आहे. तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान मागे घेतला नाही. तर त्यांच्यावर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा ठोकला शिवाय राहणार नाही असेही अमोल मिटकरी म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल परत वादग्रस्त वक्तव्य केलेला आहे. त्यांनी 2013चा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय एकदा वाचून घ्यावा. औरंगाबाद खंडपीठाने 2013 असा निर्णय दिला होता की, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेचा दुरूनही कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. एक प्रकारे असं वक्तव्य करून माननीय औरंगाबाद खंडपीठाचा अवमान राज्यपाल महोदयांनी केलेला आहे. जर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधान परत घेतला नाही तर त्यांच्यावर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा ठोकला शिवाय राहणार नाही. - आ.अमोल मिटकरी 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages