शेकापला धक्का देत शिरभावी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

शेकापला धक्का देत शिरभावी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!

 शेकापला धक्का देत शिरभावी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!


तालुक्यात शेकापला लागोपाठ धक्के ; राष्ट्रवादीला "अच्छे दिन"


सांगोला (कटूसत्य वृत्त):-गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षात निष्ठेने व सक्रियपणे काम करणाऱ्या शिरभावी ता. सांगोला येथील नवनाथ मोरे, अजित चोरमुले, काकासो चोरमुले, सिताराम कोळेकर व अजित मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात घुसमट होत असल्याने शेकापला अखेरचा लाल सलाम करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  शनिवार दि 19 फेब्रुवारी रोजी सांगोला येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे, माजी सरपंच अशोक सलगर, डी टी घोरपडे, विष्णू घोरपडे, शिवाजी साळुंखे, धनाजी साळुंखे, भाऊ शिंदे, अर्जुन शिंदे, मोहन ताटे ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सलगर अनिता ताटे आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून शिरभावी हे गाव सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून तालुक्यात ओळखले जात होते. परंतु पक्षात निष्ठावंतांना विचारात घेतले जात नसल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीपासून एकेकाळी सांगोला तालुक्यातील बलाढ्य असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला उतरती कळा लागली आहे. नुकताच जुजारपूर, गौडवाडी व मांजरी येथील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता पाठोपाठ शिरभावी येथील कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम केल्याने हा शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला जबरदस्त धक्का मानला जात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात व त्यानंतर आता लागोपाठ शेतकरी कामगार पक्षातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बड्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे इन्कमिंग झाल्याने सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कार्यकर्त्यांना सन्मान आणि न्याय देण्यास सदैव कटिबद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांवर आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात व निर्णयप्रक्रियेत सन्मानाची वागणूक देऊन प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, यापुढील काळात सांगोला तालुक्यातील खेडोपाडी व खेड्यातील घरोघरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार पोहोचविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages