सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, प्रा.काळे एस.एस यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा करण्यात आली.या कार्यक्रमात डी.फार्म प्रथम वर्षाच्या कु.डोके स्वामींनी हिने आपल्या मनोगतात, महाराजांचे शौर्य,धाडस,नियोजन व पराक्रमा बदल व महाराजांचे भारतीय इतिहासातील महत्व विशद केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, त्यामुळे परिसर शिवमय झाला होता.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाविद्यालयतर्फे अल्पउपहार देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रा.भारत गरंडे, प्रा.माळी नितिन, डॉ. शिंदे मोनिका, प्रा.कोळी आर.एम  व सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages