सांगोला नगरपरिषदेमार्फत शिवजयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी 392 व्या जयंती निमित्त 392 वृक्षांची लागवड ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

सांगोला नगरपरिषदेमार्फत शिवजयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी 392 व्या जयंती निमित्त 392 वृक्षांची लागवड !

 सांगोला नगरपरिषदेमार्फत  शिवजयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी
392 व्या जयंती निमित्त 392 वृक्षांची लागवड !




    सांगोला (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीचे औचित्य साधून शहरात विविध ठिकाणी 392 देशी वृक्षांची लागवड करून सांगोला नगरपरिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभर सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानाची सांगोला नगरपरिषद मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरास पर्यावरण पूरक हरित शहर बनवण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात असून त्यांची जोपासना ही केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती 19 फेब्रुवारी 2022 रोजी पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. महाराजांची ही 392 वी जयंती असल्याने या निमित्ताने 392 वेगवेगळी देशी प्रजाती ची झाडे लावण्यात येऊन ही जयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी केली गेली.
392 वृक्ष लागवडची ठिकाणे:
(1)जलशुद्धीकरण केंद्र -180
(2)शिवाजीनगर बगीचा -155
(3)क्रीडांगण -30
(4)शासकीय गोडाऊन-27
एकूण : 392
  सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता श्री.तुकाराम माने व  नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण टीम 3 दिवसांपासून कार्यरत होती. ही वृक्षारोपण मोहीम मुख्याधिकारी कैलास केंद्रे,पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, कार्यलयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, सहायक मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्नील हाके, लेखापरीक्षक विजयकुमार कन्हेरे, शहर समन्वयक शिवाजी सांगळे,शरद चव्हाण,खंडू कोरे,शरद थोरात व इतर नगरपरिषद  कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.सांगोला शहरात वृक्षलागवड व संवर्धन याबाबत जनजागृती होऊन पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने 16 व्या शतकात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या राजांची 392 वी जयंती 392 वृक्षांची लागवड करून पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करण्याचा हा छोटा प्रयत्न केला.कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages