Hot Posts

6/recent/ticker-posts

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

    जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन


 

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- राज्याचे जलसंपदामंत्री व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, रुपाली चाकणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंदीर समितीच्या वतीने प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन  गुरव यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून  जलसंपदामंत्री श्री .पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments