कुईवाडी (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस कमिटी अंतर्गत अल्पसंख्यांक विभागाच्या कुर्डुवाडी शहर अध्यक्षपदी हमीद शिकलकर यांची फेरनिवड करण्यात आली.या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व सोलापूर मध्य चे आ.प्रणिती शिंदे व वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत जी मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रकाश वाले,नगरसेवक रियाज हुंडेकरी,सोलापूर जिल्हा अध्यक्ष वसीमभाई पठाण,जिल्हा संघटक जहीर मणेर,सोलापूर शहर अल्पसंख्यक अध्यक्ष तोफीक भाई हत्तुरे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या शहराध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यामुळे कुर्डुवाडीत दत्ताजी गवळी,अखलाख दाळवाले,राहुल गायकवाड,गणेश जगताप,निसार शिकलकर,किशोर हजारे,रियाज शेख,प्रकाश किरवे,बंडू टोणपे,बबलू गायकवाड,सुतार पाटील व आदीनी त्यांचा सत्कार केला कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments