शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


सांगोला (कटूसत्य वृत्त):-  सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नामदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा व सोलापूर जिल्हा  परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय सौ जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचा आवारात विविध वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले या वृक्षा रोपण कार्यक्रमासाठी ,संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड संस्थेचे सचिव अंकुशराव  गायकवाड ,संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय  एम आर गायकवाड साहेब ,संस्थेच्या विश्वस्त सौ विद्या जाधव, संस्थेचे विश्वस्त  निखिल गायकवाड ,सौ शुभांगीताई पाटील व संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी या कार्यक्रम प्रसंगी नामदार जयंतराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष  बाबुराव गायकवाड ,विश्वस्त मा.एम आर गायकवाड व सचिव ए आर गायकवाड ,संस्थेचे विश्वस्त विक्रांत गायकवाड,संस्थेचे विश्वस्त  निखिल गायकवाड यांनी शुभेच्छा व्यक्त दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर ए देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages