Hot Posts

6/recent/ticker-posts

२८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ लाख आंदोलक धडकणार! -कॉ. नरसय्या आडम

२८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ लाख आंदोलक धडकणार! -कॉ. नरसय्या आडम

वाढती महागाई, बेरोजगारीच्या विरोधात व रे नगरच्या पायाभूत सुविधाकरिता


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया मागासलेल्या श्रमिकांना निवाऱ्याची प्रचंड गरज होती यावेळी त्या लोकांनी संघटित होऊन नरसय्या आडम मास्तर यांच्याकडे त्यांची कैफियत मांडले होते की अल्पसंख्यांक समाजामध्ये रोजीरोटी करून उदरनिर्वाह करणारे कित्येक गरीब कष्टकरी लोक आहेत त्या लोकांना डोक्यावर छत नाही, त्यांना घर पाहिजे तेव्हा आडम  मास्तर यांनी त्यांना वचन दिले होते की कोणत्याही परिस्थितीत सरकार पुढे ही मागणी घेऊन जाऊन आंदोलनाच्या जोरावर हक्काचं घर मिळवून देणार आणि ही वचनपूर्ती साकार होत आहे, केवळ घर देऊन चालणार नाही त्यासाठी त्या घरासोबत पायाभूत सुविधाही  महत्त्वाच्या आहेत. या पायाभूत सुविधा मिळविण्यासाठी पुन्हा एकदा संघर्षाची तयारी आपणाला ठेवावी लागणार आहे याकरिता 28 व 29 मार्च रोजी होणाऱ्या देशव्यापी सार्वत्रिक संपात अल्पसंख्यांक गृहनिर्माण संस्थेचे सर्व लढाऊ लाभार्थी सहभागी होऊन संप यशस्वी करा असे आवाहन केले. आज देशात हिंदू मुस्लिम  असे धर्मांध ध्रुवीकरण करत हिजाब सारखा वादतीत मुद्दा ऐरणीवर आणून जातीय तेढ निर्माण करू पाहत आहेत.वास्तविक हिजाब  हा मुस्लिमांचा सांस्कृतिक पेहराव असून तो त्यांचा घटनादत्त व जन्मसिध्द हक्क आहे.एवढेच नसून CAA, NRC आणि NPR बाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अद्यापही  तो विषय अधांतरी ठेवण्यात आला असून याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या बाजूने राहील.तसेच केंद्र सरकार २०१४ पासून जनता विरोधी प्रतिगामी धोरणे अमलात आणत असून जनतेला देशोधडीला लावले. आजची महागाई आकाशाला भिडलेली असून अनेक जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवांचे दर वाढलेले आहे. मात्र त्या प्रमाणात कष्ट करणाऱ्या जनतेचे उत्पन्न वाढलेले नाही. उलट कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जनतेच्या हक्काचा रोजगारही हिरावून घेतला गेला. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची ग्वाही दिलेल्या केंद्र सरकारच्या राजवटीत वाढती महागाई आणि बेरोजगारी हे उच्चांक गाठत असताना केंद्र सरकार देशाच्या विकासाची भाषा करत आहे. नुकतेच झालेल्या अर्थ संकल्पात ६० लाख नवीन रोजगार देण्याचे आश्वासन दिलेले आहे. हि विसंगती जनतेला मान्य नाही. म्हणून २८-२९  मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक देशव्यापी संपात सोलापुरातून एक लाख आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने सोलापुरातील तीस हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगरला पायाभूत सुविधांची अत्यंत गरज असून याचीही मागणी सरकारकडे करणार अशी माहिती रे नगर प्रकल्पाचे मुख्यप्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी बुधवारी दि. १६/०२/२०२२ रोजी कुंभारी येथे आयोजित केलेल्या अपना आशियाना अर्थातच आपलं घर या मेळाव्यात दिले. हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बुधवारी दि. १६/०२/२०२२ रोजी कुंभारी येथे अपना आशियाना अर्थातच आपलं घर या मेळाव्याचे रे नगर प्रकल्पाचे मुख्यप्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केले.   यावेळी माकप चे जिल्हा सचिव  ऍड.एम.एच.शेख म्हणाले कि, सोलापूर शहराच्या विकासासाठी जनतेचा प्रत्यक्ष सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरातील प्रत्येक नागरिकांच्या विकासावर अवलंबून असतो. सोलापूर सारख्या विकसनशील शहरात लोकांना किमान वेतन मिळेल अशा रोजगाराच्या संधी नाहीत. नवीन रोजगार विकसित करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. स्मार्टसिटी योजना हि केवळ लोकांना दिशाभूल करणारी योजना असल्याचे दिसून येते. कारण गेल्या ६ वर्षापासून अद्यापही स्मार्टसिटीचे काम पूर्ण झालेले नाही. स्मार्टसिटी योजनेची परिपूर्ती करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा होताना दिसत नाही. या सगळ्या परिस्थितीत सगळ्यात मोठे नुकसान स्थानिक लोकांचे होते. म्हणून सोलापूर महानगरपालिकेत विकासाची दृष्टी, प्रशासकीय कामाची माहिती, जनतेचे काम करण्याची राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ कार्यकर्ते यांना सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठविण्याची जबाबदारी जनतेची आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भांडवलदारी व जातीवादी पक्ष अनेक प्रलोभने दाखवतील या प्रलोभनांना बळी न पडता संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार बजावला पाहिजे. तरच विकासाची स्वप्ने सत्यात उतरतील. या मेळाव्याचे प्रास्ताविक  करताना कॉ.युसुफ शेख (मेजर) म्हणाले की, आपलं घर ही संकल्पना  हाकेच्या अंतरावर असून ते सत्यात येणार यात कोणतीही शंका नाही.कारण या पाठीमागे  आडम मास्तर यांचे अखंड संघर्ष आहे. रे नगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी म्हणाल्या की, येत्या 28 मार्च ला आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयवर 1 लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे तो मोर्चा आपल्या घरांच्या पाणी,रस्ते,ड्रेनिज, दिवाबत्ती या मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी आहे त्या करीता संस्थेचे लाभार्थी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. रे नगर फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.नलिनीताई कलबुर्गी, नगरसेविका कॉ.कामिनिताई आडम आदींनी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिवा कॉ. मुमताज शेख, माजी नगरसेविका शेवंताताई देशमुख, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, शंकर म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, मारेप्पा फंदीलोलू, दाउद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, मुरलीधर सुंचू, बाबू कोकणे, विक्रम कलबुर्गी, अकिल शेख, दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अनिल वासम तर आभार प्रदर्शन इलियास सिद्धिकी यांनी केले.  या मेळाव्यात लाभार्थ्यांची हजारोंच्या संख्येने मुस्लिम महिलांची उपस्थिती होती. रहीम नदाफ, हुसेन शेख, नितीन कोळेकर, राजेश काशीद, जुबेर सगरी, बजरंग गायकवाड, सिद्राम गायकवाड,अमोल काशीद ,सुजित जाधव, रहीम नदाफ, तनवीर माडिगर, प्रशांत चौगुले,गंगाराम निंबाळकर,भारत पाथरूट, आजीजा शेख, परविन सय्यद ,इब्राहिम मुल्ला,अमिना शेख ,अरबाज सगरी,हरीश पवार, असलम शेख साबेरा शेख आदींनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments