शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने शिव मूर्तीची प्रतिष्ठापना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने शिव मूर्तीची प्रतिष्ठापना

 शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने शिव मूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त आसरा येथे शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने शिव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

यावेळी RPI शहर संघटक सचिव सुशील सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शाम कदम,  बाळासाहेब फाळके, नाभिक संघाचे अध्यक्ष संतोष धोत्रे  यांच्या शुभ हस्ते शिव मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले, यावेळी उपस्थित मान्यवरांना शिवाजी कोण होता हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवशाहू प्रतिष्ठानचे संस्थापक तथा संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपप्रमुख बसवराज आळंगे, संघटक सुलेमान पिरजादे, गजू भाऊ शिंदे, अभिजित उगाडे आदी शिवभक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages