दिपकआबांनी मागणी केलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करू ;राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचे दिपकआबांना आश्वासन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

दिपकआबांनी मागणी केलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करू ;राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचे दिपकआबांना आश्वासन

 दिपकआबांनी मागणी केलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करू ; 

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचे दिपकआबांना आश्वासन


सांगोला (कटूसत्य वृत्त):- दुष्काळाशी दोन हात करून अत्यंत कमी पाण्यात शेतीतून मोती पिकवणारा सांगोला तालुक्यातील शेतकरी हा लढवय्या आहे परंतु नैसर्गिक आपत्ती व डाळिंब तसेच द्राक्ष फळबागांवर नव्याने आलेले रोग यामुळे तालुक्‍यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे या शेतकऱ्यांना आपण अडचणीतून निश्चित बाहेर काढू आणि सांगोला तालुक्याला यापुढील काळात जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागण्याची वेळ येऊ देणार नाही. रखडलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून आगामी काळात सांगोला तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आगामी अधिवेशन काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची खास बैठक घेऊन सांगोला तालुक्यातील वंचित भागाला जास्तीत जास्त पाणी कसे देता येईल याबाबत प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिला. सोमवार दि 21 फेब्रुवारी रोजी सांगोला येथे आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस परिवार संवाद यात्रेत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना नामदार जयंत पाटील बोलत होते यावेळी राज्याचे राज्य मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, विश्वनाथ चव्हाण महिला प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, उपाध्यक्ष सुहास कदम, निरीक्षक सुरेश घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील, युवा नेते डॉ. पियुष साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे-पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड, निरीक्षक दिपाली पांढरे, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले, जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, विजय पवार, सभापती अनिल मोटे, गणेश कांबळे, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, शिवाजी बनकर, विजय राऊत, सोमनाथ राऊत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार जयंत पाटील म्हणाले, दीपकआबा साळुंखे पाटील सध्या कुठेही विधान परिषद किंवा विधानसभेचे आमदार नाहीत तरीही सांगोला तालुक्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. सांगोला तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नाबाबत दीपक आबांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करून रखडलेल्या योजनांना निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले आहेत. सोमवार दि 23 रोजीही आयोजित कार्यक्रमात दीपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित जलसंपदा मंत्री पालकमंत्री तसेच मान्यवरांसमोर सांगोला तालुक्यातील सिंचन योजना पासून वंचित राहणाऱ्या गावांचा पाणीप्रश्न मिटवून हजारो हेक्टर क्षेत्राला हक्काचे पाणी मिळवून द्यावे. तसेच सांगोला तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा, व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावून सांगोला तालुका चारा छावणीमुक्त, टँकरमुक्त व रोजगार हमी योजनेच्या कामातून मुक्त करावा अशी मागणी केली होती. याच विषयी बोलताना नाम. पाटील म्हणाले आज पर्यंत दिपकआबा साळुंखे-पटील यांनी केलेल्या मागणीनुसार सरकारने रखडलेल्या सिंचन योजनांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. आजपर्यंत रखडलेल्या कामांची यादी नेहमी दीपकआबा साळुंखे पाटील वाचून दाखवतात. परंतु, शासनाने व स्वतः ने केलेल्या कामाची जाहिरात ते कधीच करत नाहीत अशी मिश्कील टिप्पणी करत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिपकआबा यांच्या कार्याचे कौतुक केले. उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, गावोगावी खेडोपाडी प्रत्येक बूथपर्यंत जाऊन पदाधिकाऱ्यांनी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार केला तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला इतर पक्षाला पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही. सांगोला तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे असे सांगून कार्यकर्त्यांच्या मनात जे दडले आहे तोच निर्णय पक्ष घेईल असे सांगून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अप्रत्यक्ष सूतोवाच केले. दरम्यान सोमवार दि 21 रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस व महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाम. जयंत पाटील, रूपालीताई चाकणकर, मेहबूब शेख, सक्षणा सलगर व सुनील गव्हाणे आदी सर्वच विभागांच्या प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. व तालुक्यातील पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काम करावे अशा सूचना दिल्या.
१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी मधुकर बनसोडे  गेली २० वर्षे तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या चंद्रकांत शिंदे यांनी वाढत्या वयोमानामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदावर गतवर्षी शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले व शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी ७ ते ८ वर्ष पेलणाऱ्या सांगोला येथील मधुकर शंकर बनसोडे यांची निवड करण्यात आली सोमवार दि 21 रोजी आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर पालकमंत्री दत्तात्रय भरणे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे आधी मान्यवरांनी नियुक्तीपत्र देऊन मधुकर बनसोडे यांची तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
२) विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघटनात्मक कार्य मजबूत आहे. 2024 रोजी येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा प्रचार व प्रसार करावा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने दीपकआबा साळुंखे पाटील यांना संपूर्ण ताकत देऊ विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी आज पासुनच कामाला लागावे ; नाम. जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages