सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या कु.श्रद्धा कडव हिने राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या कु.श्रद्धा कडव हिने राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

 सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या कु.श्रद्धा कडव हिने राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक


 


 सांगोला (कटूसत्य वृत्त):- श्री. गणपती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी,अकोले, तालुका माढा या महाविद्यालयाने राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते.या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या भरपूर विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले औषधनिर्माणशास्त्र संबंधीत संशोधन पोस्टर द्वारे सादर केले.सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्ष बी.फार्मसीच्या कु.श्रद्धा राजेंद्र कडव हिने या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. " फार्मासिस्ट युअर मेडिकेशन कॉऊन्सेलर" या विषयावर तिने सादर केलेल्या संशोधनात्मक   पोस्टर सादरीकरणास प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थिनीस प्रा.ए.डी.माळी,प्रा.एस.एम.माळी यांचे मार्गदर्शन लाभले .या तिच्या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,यांनी अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेछया दिल्या.या तिच्या यशाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

                    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages