Hot Posts

6/recent/ticker-posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम माळशिरस तालुक्यात लसीकरण समन्वयक डॉ पिंपळे यांच्याकडून पाहणी

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम माळशिरस तालुक्यात लसीकरण समन्वयक डॉ पिंपळे यांच्याकडून पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात उद्या रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या मोहिमेचा आढावा घेऊन मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मोहिमेच्या पूर्वसंध्येला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तथा लसीकरण समन्वयक डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी माळशिरस तालुका दौरा करून मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. 
डॉ पिंपळे यांनी ऊसतोड कामगारांच्या बालकांचे लसीकरणाला सुरुवात केली. आज रात्री उशिरापर्यंत ऊसतोडीची ठिकाणे,  वीटभट्ट्या, इतर स्थलांतरित कामगार यांच्या पाच वर्षाच्या आतील बालकाचे लसीकरण जिल्हाभरात सुरू झाले आहे. जिल्ह्यात चार लाख 50 हजार बालकांना पोलिओ लसीकरण केले जाणार आहे. साखर कारखाना कामगारांच्या वस्तीवरील लसीकरणप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव येथील आरोग्य निरीक्षक राजू शेख, कुंडलिक करपे, आरोग्य सेवक सचिन पिसे, विकास चव्हाण, सचिन पोटे, डाटा एंट्री ऑपरेटर रणजीत पाटील, वाहन चालक फाळके, परिचर मुन्ना सय्यद आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यात एक जिल्हास्तरीय अधिकारी, २२ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांच्यामार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून उद्या ३००२ ठिकाणी पल्स पोलिओ बूथवर लसीकरण केले जाणार आहे.
*लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी*
जिल्ह्यातील पाच वर्षाच्या आतील बालकांबरोबरच कार्य क्षेत्राबाहेरील पाच वर्षाच्या आतील लाभार्थी ऊसतोडीची ठिकाणे, कामगार वीटभट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, बसस्थानक, मंदिरे याठिकाणीही लसीकरण केंद्राची सोय केलेली आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्या. जिल्ह्यात २००० सालापासून एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही, याबाबतचे नियमित सर्वेक्षण करून आढावाही वेळोवेळी घेतला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी
दिलीप स्वामी यांनी सांगितले.
*वंचित बालकांना घरोघरी डोस- डॉ. शितलकुमार जाधव*
पल्स पोलिओ मोहिमेनंतर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्या. एक महिन्याच्या आतील जन्मलेले नवजात अर्भकाच्या विशेष नोंदी ठेवण्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments