सोपल प्रशालेची कु.मयुरी पांढरे रांगोळी स्पर्धेत द्वितीय
बार्शी (कटूसत्य वृत्त):- दिलीपराव सोपल प्रशाला चव्हाण प्लॉट बार्शी प्रशालेत इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या कु.मयुरी पांढरे हिने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बार्शी नगरपालिकेच्या वतीने न.पा. शिक्षण मंडळ बार्शी ने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत माध्यमिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला.बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील मॅडम यांचे हस्ते तसेच प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे पर्यवेक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात कु.मयुरी पांढरे हिला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या अभियानात दत्त प्राथमिक विध्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला या शाळांनी ही उस्फूर्त सहभाग नोंदवल्याने शाळेस प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले मयुरीच्या यशाबद्दल व दोन्ही शाळेच्या सहभागाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन(आण्णा) ठोंगे सरांनी मुख्या. सादिक बागवान सर,मुख्या.श्री.चंद्रकांत लोखंडे सर, श्रीमती संगीता काळे मॅडम श्री.युवराज जगताप सर,अरुणा मठपती मॅडम, श्री. श्रीकांत कुंभारे सर, श्री.सुनील लंगोटे सर,श्री. मंगेश मोरे सर श्री.सचिन काळे सर श्री.राहुल ठोंगे सर,श्री.संतोष ठोंबरे, श्रीम. विलंबिनी पाटील या सर्वांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments