Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मानसिक आरोग्यावर व्याख्यान


शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मानसिक आरोग्यावर व्याख्यान 


सांगोला (कटूसत्य वृत्त):- संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गाय, सचिव ए.आर. गायकवाड, ज्येष्ठ   विश्वस्त एम.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राध्यापकांची लेक्चर्स, सेमिनार्स, वर्कशॉप्स यांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच  एक भाग म्हणूनजिल्हा मानसिक आरोग्य कार्यकरमांतर्गत ग्रामीण रुग्णालय सांगोला, व शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज,  यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. ऋतुजा उत्पात यांचे" मानसिक आरोग्य" या विषयावर विद्यार्थी व संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित डॉ. ऋतुजा उत्पात, कोळी साहेब, समाधान शिवशरण यांचा सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. उत्पात यांनी मानसिक आरोग्य म्हणजे काय? नैराश्य येत असताना दिसणारी लक्षणे, समाज माध्यमे, त्यांचे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी 'मन' ही संकल्पना अतिशय सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना समजावून सांगितली . विद्यार्थ्यांनी ताण तणाव टाळण्यासाठी आपले आवडते छंद जोपासावेत, व्यायाम करावा, लोकांसोबत मनमोकळा संवाद साधावा अशा काही सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. ए. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. डी. बावचे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. पी. सी. चव्हाण यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा . आर. व्ही. लिगाडे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments