पंढरीत शिवसैनिकांकडून तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकरांचा सन्मान
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- अल्पावधीत आपल्या कार्यकतृत्वाने जनसामान्यात आपली वेगळी प्रतीमा निर्माण करणारे पंढरपुरचे तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमूख संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते हार शाल व भगवा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांनी तहसिल कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलवला, प्रत्येक कार्यालय सुसज्य बनवले, माहीती फलक तसेच तालुक्यातुन कामानिमीत्त येणार्यासाठी आसन व्यवस्था तसेच संपूर्ण कार्यालय परीसरात वेग-वेगळी झाडे लावून संपुर्ण तहसिल कार्यालय स्वच्छ व सुंदर बनवले.
आज पर्यत अनेक तहसिलदार या ठीकाणी आले आणी गेले परंतू कोणीही अशा प्रकारे काम केले नाही ते काम बेल्हेकर साहेबांनी करून दाखवले म्हणून त्यांचा सन्मान शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते केला, या वेळी माजी उपजिल्हाप्रमुख जयवंत आण्णा माने, जेष्ठ शिवसैनिक तथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे शहरप्रमुख काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, शिवसेना विभाग प्रमुख अरूणभाऊ कांबळे, उमेश काळे, कैलास नवले, राजाभाऊ पवार, गुरूदेवा अष्टेकर, प्रितीश पवार, राहूल पाटील, दादासाहेब सरवदे, अभि चव्हाण, चेतन नेहतराव, बबन साठे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
0 Comments