भाजपने आंदोलन सुरु केले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

भाजपने आंदोलन सुरु केले

 भाजपने आंदोलन सुरु केले 




मुंबई (कटूसत्य वृत्त):- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर राज्यातील भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने आंदोलन सत्र सुरु केल्यानंतर रात्री पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील भाजपा नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा मोहोळ तहसील कार्यालयासमोर देण्यात आल्या. यानंतर मोहोळ महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते विजयराज डोंगरे, लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages