शिंदे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

शिंदे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी

 शिंदे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी



लऊळ (कटूसत्य वृत्त):- परंडा येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची  125 वी जयंती कोरोना नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्राचार्य डॉ. दीपा सावळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत गाडगेबाबा महाविद्यालय व शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी आय.क्यू.ए.सी. चेअरमन डॉ.महेशकुमार माने,गणित विभागप्रमुख डॉ.विद्याधर नलवडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सचीन चव्हाण, वरिष्ठ लिपीक बाबासाहेब क्षीरसागर, संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे समन्वयक अनिल जानराव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी तर आभार डॉ.सचीन चव्हाण यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages