लोकनेतेच्या वजन काट्यांची भरारी पथकाकडून अचानक तपासणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

लोकनेतेच्या वजन काट्यांची भरारी पथकाकडून अचानक तपासणी

 लोकनेतेच्या वजन काट्यांची भरारी पथकाकडून अचानक तपासणी



सर्व वजनकाटे अचूक असल्याचा अहवाल


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- लक्ष्मीनगर नगर येथील लोकनेते बाबुराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या साखर कारखान्याचा 2020 - 21 चा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू आहे. शुक्रवारी दि २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने कारखान्याच्या सर्व वजन काट्याची अचानक तपासणी केली. यामध्ये वजनकाटा बिनचूक व तंतोतंत बरोबर असल्याचा अहवाल वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. या भरारी पथकामध्ये वैधमापन शास्त्र सोलापूर विभाग चारचे निरीक्षक पी.एच. मगर ,उपनियंत्रक अ. ध.गेटमे आणि लेखापरीक्षक एन. डी. माडे या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या वेळी सोलापूर वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक पी. एच. मगर यांनी काट्यावर उसाने भरलेल्या तीन ट्रॅक्‍टरचे प्रत्यक्ष वजन घेतले व रिकाम्या ट्रॅक्‍टरचेही वजन घेतले. याशिवाय दोन बैलगाड्यांचे देखील यावेळी वजन घेण्यात आले. कारखाने अगोदर वजन करून गव्हाणीकडे पाठवलेल्या परंतु रिकाम्या झालेल्या वाहनांना परत बोलावून सदर वहनाचे वाहनचालकास समक्ष परत वजन तपासणी करून कारखान्याने पूर्वीच वजन करून नोंद केल्यावर वजना सोबत प्रत्यक्ष आलेले वजन तपासून पाहिले असता ते तंतोतंत बरोबर आढळले.
वजनात कोणतीही तफावत या तपासणी दरम्यान आढळून आली नाही. याशिवाय कारखान्याकडे असलेल्या वीस किलोग्रॅम वजनाचे दोनशे पन्नास नग प्रत्येक काट्यावर ठेवून काट्यांची तपासणी केली असता सर्व काटे बरोबर असल्याचे आढळून आले. दुपारी एक वाजता सुरू झालेली ही तपासणी साडेतीनच्या सुमारास संपली. यामध्ये सर्व काटे तंतोतंत बरोबर असल्याचा तपासणी निष्कर्ष अहवाल सदर पथकाने यावेळी लोकनेते कारखान्यास आणि प्रशासनास दिला आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages