धनराज शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 24, 2022

धनराज शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.!

 धनराज शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.!


कुर्डूवाडी न.पा.आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान.!



कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डुवाडी नगर परिषद आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचारी महिलांचा साडी वाटप करून सन्मान करण्यात आला.माढा वेलफेयर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष,विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे चेअरमन तथा माढा पंचायत समितीचे सदस्य धनराज दादा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त हा उपक्रम धनराज युवा ब्रिगेड च्या वतीने कुर्डूवाडी पंचायत समिती च्या आ.कै.विठ्ठलराव शिंदे सभागृहांमध्ये घेण्यात आला.


प्रारंभी आ.कै.विठ्ठलरावजी शिंदे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता बँकेचे चेअरमन अर्जुनराव बागल हे होते. 



यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्ताजी गवळी,शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय दादा टोणपे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दत्ताजी काकडे,शिवस्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब गवळी,युवा नेते वसीमभाई मुलांणी,भोसरे तालुका पंचायत सदस्य सुरेश बागल,नगरसेवक संजय गोरे,उद्योगपती महेश गांधी,भाजपचे योगेश पाटील,न.पा.आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण,माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आण्णासाहेब मोरे,जय किसान ॲग्रो कंपनीचे सेल्स मॅनेजर प्रतिक शिंदे,रिपाईचे युवक आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र प्रा.आशिष रजपूत,विशाल मोरे,बबलू कांबळे,अखलाक दाळवाले आदींसह मान्यवर उपस्थित होते.


येथील सामाजिक कार्यकर्ते नितिन लांडगे यांचा प.स.येथील काही परिसराची स्वछता रंगरंगोटी सेवाभावी वृत्तीतून श्रमदान करून केल्या बद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व एक फळाचे झाड देऊन विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला


याप्रसंगी बोलताना सफाई कर्मचारी महिलांनी अस्या अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत असलेल्या धनराज दादांचे मनापासून कौतुक केले व आनंद ही व्यक्त केला. धनराज दादा शिंदे मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा आदर्श इतर राजकीय नेते मंडळींनी घ्यायला हवा अशी भाबडी आशा ही यावेळी व्यक्त केली गेली एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा दुर्लक्षित घटकाला न्याय मिळाल्याच्या भावना व्यक्त करत होत्या.


 येथील उमेद संस्थेतील निराधार मतिमंद विकलांग बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी बस्काने पट्या,सीलिंग फॅन तसेच फराळ व खाऊचे वाटप करण्यात आले. 


या कार्यक्रमासाठी आकाश फोटो स्टुडिओचे मालक आकाश लांडगे,अमर शहा,बंकट टिंगरे,टाकळीचे दादासाहेब हांडे,राजेंद्र केदार,सुजित भोसले सुजित लोंढे,महेश डोके,संदीप गोरे,अर्जुन खटके,सागर खटके,आनंद पानबुडे,पृथ्वीराज पाटील,श्रीकांत पाटील,महेश मारकड,मयूर शिंदे राहुल वरपे,गौरव पाडुळे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी सूत्रसंचालक सतीश महिंगड़े यांनी तर आभार केशव आवटे यांनी मांनले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages