संभाजी ब्रिगेड युवती अध्यक्षपदी त्रिवेणी मोगल यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची बैठक पार्क चौकातील हॉटेल सह्याद्री येथे पार पडली या बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या युवती प्रमुख पदी त्रिवेणी मोगल यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते देण्यात आले तसेच यावेळी मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी श्री जगदाळे यांची निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्ष त्रिवेणी मोगल यांनी सध्या समाजामध्ये महिलावर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे तसेच महाविद्यालयीन युवतींचे सुद्धा छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत महिलांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करेन असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपप्रमुख सिताराम बाबर, नागेश पवार, गजानन शिंदे, अनिल कोकाटे, महेश हिरेमठ महेश माने शिरीष जगदाळे दत्ता शिंदे अनिल कांबळे निलम भोसले, शितल जगदाळे, संचिता शिराळ, ऋतुजा पवार, करिष्मा लालबेगी, वर्षा मोरे, दिपाली पवार ईत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment