वैरागकरांचा स्वाभिमान आणि बार्शीकरांचा अभिमान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 22, 2022

वैरागकरांचा स्वाभिमान आणि बार्शीकरांचा अभिमान

 वैरागकरांचा स्वाभिमान आणि बार्शीकरांचा अभिमान




वैराग  (कटूसत्य वृत्त):-  वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरंजन भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने, भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सर्व १७ जागेवर तर शिवसेना आणि काँग्रेस आघाडीने १५ जागेवर उमेदवार उभे केले होते तर दोन अपक्षाला पुरस्कृत केले होते. प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादीचे अतुल मोहिते ३४८ मते घेऊन विजयी झाले. याच प्रभागातून भाजपाचे मधुकर कापसे व शिवसेनेचे अरुण सामंत हे पराभूत झाले. प्रभाग क्र.दोन मधून पं.स.सदस्य तथा उमेदवार निरंजन भूमकर ३६२ मते घेवून विजयी झाले. प्रभाग क्र.३ मधून राष्ट्रवादीच्या तृप्ती निरंजन भूमकर ६८४ मते घेऊन विजयी झाल्या. प्रभाग क्र.चार मधून राष्ट्रवादीच्या अनुप्रिया घोटकर (२३९ मते), प्रभाग क्र.पाच मधून राष्ट्रवादीच्या गुरुबाई झाडमुखे ३९६ मते घेऊन विजयी झाल्या तर माजी जि.प. सदस्य तेजस्विनी मरोड व भाजपाच्या रेश्मा शिंदे या पराभूत झाल्या आहेत. प्रभाग क्र.सहा मधून राष्ट्रवादीच्या आसमान मिह (३३८ मते), प्रभाग क्र.७ मधूनराष्ट्रवादीच्या पद्मिन सुरवसे (२२४ मते), प्रभाग क्र.८ मधून भाजपाच्या राणी आदमाने या ३९३ मते घेऊन विजय झाल्या तर राष्ट्रवादीच्या कविता खेदाड व माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर यांच्या पत्नी सुप्रिया निंबाळकर या पराभूत झाल्या. प्रभाग क्र.९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जैतुनबी बागवान या ३७० मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर माजी जि.प. सदस्य शिवसेनेचे उमेदवार मकरंद निंबाळकर व भाजपाचे दीपक माने हे पराभूत झाले आहेत. प्रभाग क्र.१० मधून राष्ट्रवादीचे नागनाथ वाघ ४२४ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग क्र.११ मधून भाजपाचे श्रीशैल्य भालशंकर (२१९ मते), प्रभाग क्र.१२ मधून राष्ट्रवादीचे अक्षय साठे हे ३१८ मध्ये घेऊन विजयी झाले तर भाजपाचे दिलीप गांधी पराभूत झाले आहेत. प्रभाग क्र.१३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा माजी सरपंच सुजता डोळसे या २८५ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र.१४ मधून राष्ट्रवादीचे अजयकुमार काळोखे (१७८ मते), प्रभाग क्र.१५ मधून राष्ट्रवादीच्या जयश्री घोडके (३४७ मते) तर प्रभाग क्र.१६ मधून भाजपाच्या अर्चना माने या २८६ मते घेऊन विजयी झाल्या आहेत प्रभाग क्र.१७ मधून माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर यांचे चिरंजीव भाजपाचे शाहूराजे निंबाळकर हे ३३३ मते घेऊन विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा या प्रभागात पराभव झाला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages