अखंडपणे समाजकार्य घडो व संघटन कौशल्य मजबूत व्हावे; अक्कलकोट स्वामी चरणी सुरवसे पाटील यांनी केल्या भावना व्यक्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 28, 2022

अखंडपणे समाजकार्य घडो व संघटन कौशल्य मजबूत व्हावे; अक्कलकोट स्वामी चरणी सुरवसे पाटील यांनी केल्या भावना व्यक्त

            अखंडपणे समाजकार्य घडो व संघटन कौशल्य मजबूत व्हावे                                

अक्कलकोट स्वामी चरणी सुरवसे पाटील यांनी केल्या भावना व्यक्त


        पुणे (कटूसत्य वृत्त):- अखंड राज्याच्या विविध जिल्ह्यात स्वाभिमानी ब्रिगेड संघटना कार्यरत असून, संघटनेचा पाया विधायक आणि सामाजिक कार्यावर मजबूत रित्या उभा राहिला आहे. असेच कार्य माझे हातून अखंड पणे घडो अशा भावना स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस युवा नेते रोहन सुरवसे पाटील यांनी अक्कलकोट स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने केलेल्या सत्कार प्रसंगी  व्यक्त केल्या.  २६ जानेवारी रोजी रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधत अक्कलकोट स्वामींच्या चरणी नतमस्तक होणे करीता रोहन सुरवसे पाटील अक्कलकोट येथे आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनातील समाज कार्याबद्दलच्या  भावना व्यक्त केल्या.   रोहन सुरवसे पाटील यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी रोहन सुरवसे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रहार संघटना अक्कलकोट शहराध्यक्ष अमर शिरसाठ, शेखर वाले, निशांत निंबाळकर, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages