Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; पुनावाला चंद्रशेकरन यांना पद्मभूषण जाहीर

 पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी पुनावाला चंद्रशेकरन यांना पद्मभूषण जाहीर

पुणे (कटूसत्य वृत्त):- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.एकूण १२८ जणांना २०२२ सालासाठीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यामध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासहीत कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.


महाराष्ट्रामधील आणखीन एक खास नाव या यादीमध्ये आहे ते म्हणजे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांचे. त्यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो होता. त्यातूनच पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. लस बनवणारी सीरम ही जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.


सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटिस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जात आहे. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार केला आहे. कोरोना नियंत्रणात सीरमच्या लशीचा मोठा वाटा आहे.


डॉ.सायरस पुनावाला यांचे जागतिक पातळीवरील लसीकरणाचे योगदान पाहता, त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी, भारत सम्मान फोरम कडून, करण्यात आली होती. डॉ.पुनावाला यांना 'पद्मभूषण' मिळाल्याचाही मनोमन आनंद झाला असल्याचे, भारत सम्मान फोरमचे युवराज काकडे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments