पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने ऑनलाइन बैलांची रॅम्पवॉक स्पर्धेचे आयोजन
हवेली (प्रविण शेंडगे):- थेऊर येथील पैलवान दत्तात्रय उर्फ (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने हवेली तालुक्यातील शेतकरी व बैलगाडा मालक यांच्यासाठी 22 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत बैलांची रॅम्पवॉक स्पर्धेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. बैलगाडा शर्यत म्हटले की शेतकऱ्यांचा जीव की प्राण असे आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती आता नुकतीच बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यातच कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेमुळे शेतकऱ्यांच्या आनंदा वरती विरजन पडले आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून हवेली तालुक्यातील बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांसाठी पैलवान आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ऑनलाइन रॅम्पवॉक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा ऑनलाईन बैलांचे रॅम्पवॉक स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले.
कोरोणामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले यातील अनेक शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या बैलांची देखबाल आणि संगोपनही केले परंतु मधल्या काही काळामध्ये या शर्यती वरती बंदी घालण्यात आली.
त्यामुळे ही स्पर्धा चालू होण्यासाठी शेतकऱ्यांनी, बैलगाडा मालकांनी,सर्वोच्च न्यायालया मध्ये लढा दिला. त्यानंतर नुकतेच काही अटींवर ती परवानगी देण्यात आली. परंतु कोरोणा च्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे बैलगाडा शर्यत स्पर्धा काही काळासाठी थांबविण्यात आले आहे.
पै. दत्तात्रेय (आबा) काळे हे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैलगाडा शर्यती चे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगून ऑनलाइन रॅम्प वॉक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.
या स्पर्धेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. बक्षीस समारंभ 4 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैलांची रॅम्पवॉक अशी आगळी वेगळी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा पहात आहे बैलगाडा शर्यतीचे महत्त्व ओळखून आणि बैलगाडा शर्यतीचे बंदी नुकतीच उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा व बैलगाडा मालक यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आव्हान केले *शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक (बापू) पवार
0 Comments