छञपती राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य ई श्रम नोंदणी शिबिराचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छञपती राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हुडको नं.3 कुमठा नाका परिसरात गोरगरीब जनतेला सरकार च्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भव्य ई श्रम नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आ.प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच प्रविण निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रभाकर गोरंटी, ॲड. संजीव सदाफुले, तन्वीर इनामदार ,मार्गदर्शक प्रकाश इंगळे,संस्थापक नागेश इंगळे, डॉ. माने, उत्सव अध्यक्ष रोहन काळे व समस्त N भाई मित्र परिवार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार विनोद गोपाळे यांनी केले.
No comments:
Post a Comment