शाॅर्ट सर्किट मुळे ६ एकर ऊस जळुन खाक
माढा (कटूसत्य वृत्त):-विजेच्या शार्ट सर्किट मुळे माढा तालुक्यातील कुंभेज गावातील व्हनमाने वस्तीवरील तिघा शेतकर्याचा ६ एकर ऊस जळुन खाक झाला.मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
महाविर मधुकर व्हनमाने दिड एकर, राहुल मधुकर व्हनमाने दिड एकर,
हरिबा बाबुराव व्हनमाने तिन एकर असा तिघा शेतकर्याचा ६ एकर ऊस जळुन गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.प्रशासनाने जळुन गेलेल्या ऊसाचे पंचनामे तत्परतेने करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यानी केली आहे.तसेच बोअर च्या मोटारी देखील जळुन गेल्या असुन त्या बोअर मध्ये पडल्याने मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment