उप अभियंता मधुकर सुळ यांची, कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 25, 2021

उप अभियंता मधुकर सुळ यांची, कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती....

 उप अभियंता मधुकर सुळ यांची, कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती...


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील मधुकर अंबादास सुळ हे मोहोळ शहरातील जिल्हा परिषद शाळा येथे पहिली ते चौथी नागनाथ विद्यालय मोहोळ ते पाचवी ते दहावी चंडक कॉलेज सोलापूर येथे इंजिनिअरिंग डिप्लोमा करून सोलापूर येथील डब्ल्यू आय टी कॉलेज मध्ये बी ई सिव्हिल इंजिनिअरिंग करून सिविल वेणूताई नगर इंजीनियरिंग कॉलेज कराड एम ई स्ट्रक्चर शिक्षण पूर्ण केले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन मधुकर अंबादास सुळ हे एमपीएससी विभाग यातून परीक्षा उत्तीर्ण होऊन जि प बांधकाम उपअभियंता करमाळा उस्मानाबाद तुळजापूर यासह जन्मगाव मोहोळ व भीमा कोरेगाव या ठिकाणी त्यांनी उप अभियंता सेवा बजावली यानंतर सार्वजनिक बांधकाम उप विभाग , दौंड आपली सेवा बजावली 18 नोव्हेंबर रोजी च्या राज्य शासनाच्या आदेशान्वये त्यांची कार्यकारी अभियंता रत्नागिरी म्हणून पदोन्नती होऊन रत्नागिरी जिल्ह्या कार्यकारी अभियंता म्हणून त्यांना रुजू करण्यात आले.
मधुकर सुळ हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत सूळ यांचे ते मोठे बंधू या पदोन्नती मुळे मोहोळ शहरातील नागरिक आणि मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages