रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने गरजू शेतकरी महिलांना साहित्य वाटप
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला रोटरी क्लब च्या वतीने राऊत मळा सांगोला येथे गरजू शेतकरी महिलांना चप्पल,जेवणाचा डबा,पाण्याची बाटली आणि पिशवी अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो विजय म्हेत्रे,सचिव श्रीपती आदलिंगे,डॉ प्रभाकर माळी, सुरेश माळी, इंजि मधुकर कांबळे,इंजि हमीद शेख,ऍड विशाल बेले,ऍड सचिन पाटकूलकर,डॉ सोनलकर,डॉ पांडुरंग गव्हाणे,प्रा साजीकराव पाटील,धनाजी शिर्के,गोविंद माळी, संतोष गुळमिरे, श्री डोंबे,विकास देशपांडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विजय म्हेत्रे यांनी केले .तर मनोगत नीलकंठ लिंगे,डॉ प्रभाकर माळी, इंजि मधुकर कांबळे,इंजि हमीद शेख ,गोविंद माळी, सुरेश माळी, सचिव श्रीपती आदलिंगे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास राऊत मळा येथील असंख्य महिला उपस्थित होत्या.सदर महिलांनी रोटरी क्लबच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
0 Comments