Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यातील जाधववाडी येथे विठ्ठलराव शिंदे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला

 माढा तालुक्यातील जाधववाडी येथे विठ्ठलराव शिंदे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोरोना काळात  उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तीचा  सन्मान करण्यात आला.





माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील जाधववाडी येथे विठ्ठलराव शिंदे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोरोना काळात  उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तीचा  सन्मान करण्यात आला. अश्विनी रूग्णालय कुंभारी येथे कार्यरत असलेले जाधववाडी चे रहिवासी असलेले डॉ.प्रताप भिमराव चवरे यांनी  कोरोना काळात उत्कृष्ट रूग्णसेवा देऊन अनेक नागरिकांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांचा यावेळी शाल,श्रीफळ सन्मानपत्र देऊन   विशेष सन्मान केला.तसेच कांतीलाल साळु़ंखे यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच कोरोना काळात  गावासाठी योग दान दिलेल्या अन्य जणांचा सन्मान झाला.वाचनालयाचे अध्यक्ष   तुकाराम भाकरे यांनी प्रास्ताविक केले.तंटामुक्त समितीचे नूतन अध्यक्ष पदी निवड झालेल्या  दिनेश भाकरे यांचा देखील सत्कार झाला. यावेळी  शिवाजी चव्हाण,सतीश हांडे,अमोल चवरे,जयसिंग जाधव,परमेश्वर जाधव,समाधान राऊत जयदीप हा़ंडे,ग्रा.पं.सदस्य  युवराज परांडे,ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव,विजय अवचर,सुदर्शन भांगे,सोमनाथ कन्हेरे, नागनाथ घोंगाने  आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुकाराम भाकरे यांनी तर आभार चंद्रकांत काटे यांनी मानले

Reactions

Post a Comment

0 Comments