Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात शिवसेनेच्या आक्रमकते पुढे महावितरण नमले,शिवसेनेच्या आंदोलनात शेतकर्याचा सहभाग

 माढ्यात शिवसेनेच्या आक्रमकते पुढे   महावितरण नमले,शिवसेनेच्या आंदोलनात शेतकर्याचा सहभाग 


माढा  (कटूसत्य वृत्त):- महावितरण  कडुन सुरु असलेली विज तोड  मोहिम तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी   माढ्यात  शिवसेना शहराध्यक्ष शंभु साठे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी  भव्य रास्ता रोको आंदोलन झाले.तसेच माढा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन झाले.महावितरणची सुरु  असलेली   सुलतानी  कारवाई असल्याचे म्हणत महावितरण च्या विरोधात या आंदोलनात राग आवळण्यात आला. यावेळी जोरजोरात हालगी नाद करीत  घोषणाबाजी करण्यात आली.यामुळे परिसर दणाणून गेला.
जो पर्यंत शेतकर्याची विज  कनेक्शन जोडली जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार घेतला.दरम्यान या आंदोलनात शेतकर्यानी बहुसंख्येने सहभागी झाले. सेनेच्या,शेतकर्याच्या आक्रमकतेपुढे अखेर महावितरण चे अधिकारी देखील  नरमले.अनेक तास चाललेल्या या आंदोलनानंतर विज कनेक्शन जोडण्याच्या लेखी आश्वासनानंतर सेनेचे पदाधिकारी व  शेतकर्यानी सायंकाळी ५ वाजता आंदोलन मागे घेतले. माढ्यातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात माढा शहर शिवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष शंभु साठे,युवा सेना अध्यक्ष भैय्या खरात  यांच्या नेतृत्वाखाली  महावितरण च्या विरोधात  जवळपास  ३००  शेतकर्याच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलनास  मंगळवारी १०.३० वाजता सुरुवात  झाली. यावेळी बोलताना भाषणातून  शंभु साठे यांच्यासह शेतकर्यानी महावितरण च्या कारभाराचे वाभाडे काढुन अधिकार्याच्यापुढेच प्रश्नांची सरबत्ती  उपस्थित केली.आंदोलनात भय्या खरात,मालोजी आडकर,मोहन बारबोले,संदीप शिंदे,हनुमंत जाधव,संदीप पाटील,बशीर आतार,नाना साळुंखे,स्वप्नील खरात,ओंकार चव्हाण,शहाजी  चवरे,दत्ता अंबुरे,काका कदम,राहुल लंकेश्वर,गुरुराज कानडे,सत्यम लोंढे,बाळासाहेब पवार,भागवत साठे,आबा साठे,बाळासाहेब नाईकनवरे,तानाजी जाधव,सचिन अवघडे,रवी कांबळे, यशवंत पाटील,गौतम शिंदे,दिनेश गाडेकर,शरद वारगड, पंडित साळुंखे,अक्षय रणदिवे,समाधान सुतार.आदी सह अन्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनावेळी  सहाय्यक पोलिस  निरीक्षक शाम बुवा यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.आंदोलनावेळी रस्याच्या दुतर्फा मोठ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दोन टप्यात  ५ हजार भरण्याचे आश्वासन-विज कनेक्शनची जोडणी केली जाईल.त्यासाठी शेतकर्यानी  दोन टप्यात ५  हजार रुपये भरण्याचे  आश्‍वासन शिवसेना पदाधिकारी व  शेतकर्याना माढ्याचे उपविभागीय अभियंता    संतोष कैरमकोन्डा यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आश्वासनाची पुर्तता महावितरण च्या अधिकार्यानी न केल्यास महावितरण चे  कार्यालय  शेतकर्याच्या समवेत ताब्यात घेऊन अधिकार्याना कोंडणार आहोत-
शंभु साठे,शिवसेना शहराध्यक्ष माढा

Reactions

Post a Comment

0 Comments