पारंपरिक प्रथेला बगल,पाण्यात अस्थिचे विसर्जन न करता शेतात अस्थि टाकुन लावली १० आंब्याची झाडे,अंजनगाव(उमाटे)गावच्या काशिद कुटूबिंयाचा आदर्श
माढा (कटूसत्य वृत्त):- मनुष्याच्या मृत्युनंतर त्यांच्या शरीराची आस्थी ही एखाद्या नदीप्रवाहात विसर्जन करण्याची रुढी पारंपारिक प्रथा आजतागायत चालतच आली आहे. व्यक्ति मरण पावला कि त्यांची आस्थी पंढरपुरच्या चंद्रभागेत विसजिॅत केली जाते.मात्र या प्रथेला बगल देत माढा तालुक्यातील अंजनगाव(उमाटे)येथील काशिद कुटूबिंयानी वडिलांच्या मृत्युनंतर आस्थी नदीप्रवाहात न टाकता तिच माती शेतातील खड्यात टाकुन त्यावर वृक्षारोपण केले आहे. अंजनगाव(उमाटे) ता.माढा येथील शेतकरी दत्तात्रय कृष्णा काशिद यांचे अल्पशा आजाराने १९ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते.आस्थी विसर्जन करण्याच्या दिवशी मुलगा पोपट काशिद,अंगदराव पाटील यांचेसह काशिद कुटूबियांनी आस्थी पाण्यात विसर्जित न करता दतात्रय काशिद यांनी काबाडकष्ट केलेल्या त्यांच्या शेतात खड्डा खोदुन त्यात रक्षा व आस्थी टाकुन खड्यात १० आंब्याच्या वृक्षाचे रोपण केले.कुटूबांतील प्रत्येक सदस्यांनी एका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी घेत संवर्धन करण्याची शपथही यावेळी घेतली.काशिद परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले,३ सुना,६ नातवंडे असा परिवार आहे.माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट काशिद यांचे ते वडील होत.
0 Comments