Ads

Ads Area

सांगोला तालुका काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी.

 सांगोला तालुका काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी.



सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुका काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने  भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन  करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनजागरण अभियानांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा ठसा जगभरामध्ये सर्व ज्ञात आहे भारताच्या जडणघडणीमध्ये इंदिराजींनी घेतलेल्या अनेक निर्णय हे जागतिक स्तरावर गौरविले गेले होते. त्याचबरोबर देशामध्ये सामाजिक समता  अखंड टिकावी म्हणून  त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या होत्या. केवळ राजकारण न करता देशहिताच्या असंख्य गोष्टींवर भर देत त्यांनी या देशांमध्ये गोरगरिबांच्या न्यायाचा लढा लढला. असे मत या वेळी सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. महादेव कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष ॲड. महादेव गोरख कांबळे,सांगोला तालुका काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय वाघमारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय काशिनाथ आप्पा काटे यांचे चिरंजीव आनंदा काटे, कवी गिरीधर इंगोले, दत्तात्रय मस्के, कवी प्रेमकुमार वाघमारे, विठ्ठल शिंदे, कवी नामा कांबळे गायक सुधीर वाघमारे, बाजीराव रणदिवे त्याच बरोबर काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close