Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्याचा आहे वशिला त्यानेच जावे लसीला ; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

ज्याचा आहे वशिला त्यानेच जावे लसीला ; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

वैद्यकीय अधीक्षक यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांना होतोय मानसिक त्रास

          सांगोला (कटूसत्य वृत्त):-  सांगोला शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे जिकिरीचे झाले असून शहरात सुरू असलेल्या अहिल्यादेवी होळकर सभागृहात दिवसाढवळ्या वशिला लावणाऱ्या नागरिकांना पाच मिनिटांत लस देवून खुश करून मर्जी सांभाळण्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि नेमणुकीस असलेले शिक्षक मश्गुल झाल्याचे चित्र दिसत असून अनेक नागरिकांनी याबाबत आरोग्य प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

          खुद्द आरोग्य विभागातील कर्मचारीच आणि लसीकरण नोंदणीसाठी नेमलेले शिक्षक जणू आपणच लस सर्व नागरिकांना मिळवून देतोय या अविर्भावात वागत आहे,तर वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य असताना त्याच्याकडेच दुर्लक्ष करत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांतून बोलले जात आहे.याकडे दस्तुरखुद्द ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ उत्तम फुले यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

          कोरोना रुग्णसंख्या सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांना मात्र कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात तालुका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. 

          सध्या लसीकरणाची गती  कासवगतीने जात जवळपास वीस हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  लसीकरणामध्ये 'फ्रंट वर्कर' आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य दिले जाणे अपेक्षित असताना मर्जीतील लोकांना तात्काळ आणि विना वेळ वाया न घालविता लस दिली जात असल्याचे चित्र अहिल्यादेवी सभागृहातील लसीकरण केंद्रात दिसत आहे.ज्या लोकांना प्राधान्य दिले जात आहे,त्यांच्या नावाखाली काही अधिकारी राजकीय लोकांच्या जवळच्या 'बगल बच्यांना' खुश करण्यासाठी लस दिली जात आहे की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

          एखादा फायद्याचा आणि कामाचा नौकर वर्ग आला की हेच लसीकरण आणि नोंदणी करणारे शिक्षक आणि अधिकारी हातातील काम आणि रांगेतील नागरिकांना तिथेच वाऱ्यावर सोडून त्या VIP नागरिकांना लसीच्या ठिकाणापर्यत नेवून लस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावर आरोग्य विभागातील कर्मचारी आणि नेमलेले शिक्षक किती हस्तक्षेप करीत आहेत.या वरून दिसते.या वरून लवकरच या लसीकरण  केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांतून केली जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments