Hot Posts

6/recent/ticker-posts

14 व्या वित्त आयोगात कोळे गावात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार - हरिभाऊ पाटील

 14 व्या वित्त आयोगात कोळे गावात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार - हरिभाऊ पाटील

चौकशी समिती नेमल्याचा गटविकास अधिकाऱ्याचा फार्स


सांगोला (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील कोळे गावात 14 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी अन्यथा 30 मार्च 2020 रोजीउपोषण करू असे पत्र दिले असता गटविकास अधिकारी यांनी पुढील दोन महिन्यात चौकशी करू असे पत्र देऊनसुध्दा आजवर कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरी यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अन्यथा सांगोला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे.
     कोळे गावात 14 व्या वित्त आयोगातून मागील पाच वर्षात जवळपास 63 लाख रुपयांची कामे ही बोगस पध्दतीने करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी अशी सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी पत्राद्वारे केली होती. त्यावर गटविकास अधिकारी यांनी दि. 24 मार्च 2020 रोजी दिलेल्या पत्रान्वये उप अभियंता जि. प. (बांधकाम) उपविभाग सांगोला, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सांगोला व व्ही. एस. फुले, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सांगोला यांना आदेशीत केले होते. त्यांनी पुढील दोन महिन्यात कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचे पत्राद्वारे कळविले होते. मात्र आजपावेतो कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली नाही. 
       14 व्या वित्त आयोगातून केलेल्या कामामध्ये झालेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यामध्ये प्राथमिक शाळांना स्मार्ट टी व्ही व एल ई डी टी व्ही पुरविणे, आर ओ प्रणाली बसविणे,  रस्ता दुरुस्ती करणे, एल ई डी बल्ब बसविणे, विहिरीचा गाळ काढणे, रस्ता मुरुमीकरण, स्मशानभूमी वाँल कंपाउंड दुरुस्ती करणे इत्यादी कामे आहेत. सदर कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्टपणे दिसत असून यामध्ये सबंधित शाखा अभियंता, उप अभियंता व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा हरिभाऊ पाटील यांनी
 दिला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments