कोळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमिपूजन कार्यक्रमास स्मारक समितीस आंबेडकरी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांचा पडला विसर
सांगोला (कटूसत्य वृत्त):- महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीविहार व अभ्यासिका यांचा भूमी पूजनाचा कार्यक्रम आज रविवार दि-२० जून रोजी कोळा ता सांगोला येथे आयोजित केलेला आहे.सांगोला तालुक्यातील कोळा जि. प .गटामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम होणे म्हणजे आंबेडकरी अनुयायांसाठी हा ऐतिहासिक व चांगला कार्यक्रम आहे.या स्मारकांमुळे येणाऱ्या पिढीला व आंबेडकरी अनुयायांना हे स्मारक प्रेरणा देणारे ठरणार आहे, त्यामुळे तमाम सांगोला तालुक्यातील आंबेडकरी प्रेमींना याचा आनंद झाला आहे. व त्याचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.
जि प च्या विशेष सेस फंडातून कोट्यवधींचा निधी दिल्याने आंबेडकर प्रेमी जनतेतून सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. या साठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच जि प सदस्य व नेतेमंडळींचे देखील कौतुक केले जात आहे.
परंतु भूमिपूजन कार्यक्रमाची पहिली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या पत्रिकेमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेतेमंडळी, जि प सदस्य व त्यांचे पदाधिकारी यांची नावे छापली होती,त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी, पक्षाचे ,संघटनांचे,पदाधिकारी यांची नावे वगळण्यात आली होती,सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे सुद्धा नाव वगळण्यात आले होते. परंतु दि 20 जून च्या वृत्तपत्रातील नवीन निमंत्रण पत्रिकेमध्ये देखील आंबेडकरी चळवळीचे पक्ष,त्या पक्षाचे पदाधिकारी, आंबडेकरी चळवळीच्या संघटनांचे पदाधिकारी तसेच ज्यांनी या स्मारकासाठी जमीन दिली ,ते आंबडेकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद मोरे यांचे व त्यांच्या कुटूंबियाचे व दलित चळवळीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आजच्या कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसल्यामुळे समस्त सांगोला तालुक्यातील आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांमध्ये जि .प. सदस्य सचिन देशमुख व सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत कोळे यांच्या विषयी नाराजी पसरली आहे.
वास्तविक पाहता भूमी पूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सांगोला तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेतेमंडळी व त्यांचे पदाधिकारी,जि प चे सर्व अधिकारी व सदस्य यांची नावे,पत्रिकेमध्ये छापलेली आहेत,परंतु दलित चळवळीचे, पक्ष संघटनांचे पदाधिकारी व जमिन दान देणारे यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत जाणीव पूर्वक वगळलेली असल्यामुळे समस्त आंबेडकर प्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त केली आहे.
वास्तविक पाहता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी प्रेरणास्थानच आहेत.त्यामुळे आजच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा आम्हां आंबेडकर प्रेमींना आनंदच झालेला आहे, परंतु निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्वच पक्षाचे नेतेमंडळी,व पदाधिकारी यांची नावे असताना जाणीवपूर्वक आंबेडकरी चळवळीच्या पक्षाचे पदाधिकारी व जमीन दान देणाऱ्या मोरे कुटुंबीयांचे नावे वगळल्याने आंबेडकर प्रेमीमध्ये नाराजी दिसत आहे.
--खंडू सातपुते (तालुका अध्यक्ष आर पी आय)
0 Comments