मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
आमदार यशवंत माने यांची ग्वाही
सुभाषनगर मध्ये कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील हे आजतागायत प्रयत्नशील आहेत. मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास केवळ राष्ट्रवादीच साध्य करू शकते या विश्वासाने शहरातील मतदार बांधवांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात विकासाची सत्तासूत्रे दिली. वित्तमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहराला आतापर्यंत तब्बल चाळीस कोटी रुपयांचा विकासनिधी विविध योजनांच्या माध्यमातून खेचून आणला आहे. यापुढील काळातही संपूर्ण शहरातील सर्वच प्रभागांना रस्ते, पाणी, आरोग्य, वीज विषयक मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली.
मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये समावेशित असलेल्या सुभाष नगर परिसरातील दोन कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे उदघाटन आमदार यशवंत माने आणि राष्ट्रवादीचे युवानेते तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार यशवंत माने बोलत होते. यावेळी जेसीबी यंत्राचे पूजन करून श्रीफळ वाढवून सिद्ध नागेश हॉटेल ते राकेश देशमाने यांचे घर त्याचबरोबर गवळी घर मेटकरी घर या रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक मुस्ताक अहमद शेख यांनी माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत या कामासाठी नगरविकास विभागाकडून निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून काँक्रिटीकरण काम होणार आहे.
यावेळी मुस्ताक शेख, प्रमोद डोके, संतोष सुरवसे,रोहित फडतरे इलियास शेख,
संतोष खंदारे, दत्ताभाऊ खवळे, आनंद गावडे राजाभाऊ सुतार, शिवाजी गवळी, कुंदन धोत्रे, बंडू देशमुख काकाराजे भोसले, रविंद्र शेंडगे, राकेश देशमाने, सम्राट सवासे ,योगेश ओहोळ, जयवंत गुंड, सचिन फाटे,बापु शेख, गोटू बरकडे, नागेश बिराजदार, संतोष सोलनकर, प्रदीप गुंड, अनिल गिड्डे, मधुकर टकले, दगडू कदम, प्रदीप घोडके, हुजेफ शेख,रमजान पटेल, हरिष शेख सोयब शेख इत्यादीसह प्रभाग क्रमांक सोळा मधील नागरिक उपस्थित होते.
0 Comments