Hot Posts

6/recent/ticker-posts

ए .पी.आय.प्रशांत पाटील साहेब आपल्यात हिंमत असेल तर "त्या" देशी दारू दुकानावर कारवाई करा, अनेक सामाजिक संघटनेची मागणी

 ए .पी.आय.प्रशांत पाटील साहेब आपल्यात हिंमत असेल तर "त्या" देशी दारू दुकानावर कारवाई करा, अनेक सामाजिक संघटनेची मागणी

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- करकंब हे पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे व्यापारी पेठेचे गाव असून, गावातील शांतता, आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन च्या अखत्यारीत करकंब येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आहे.मात्र पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आणि भर चौकात असलेल्या देशी दारू चे दुकान ऐन कोरोनाच्या काळात आणि शासन नियमाची पायमल्ली करीत,करकंब पोलिसांच्या नाकावर टिच्चून रविवारी तीन वाजेपर्यंत खुलेआम चालू होते.स्वतःला कर्तव्य दक्ष म्हणून डंखा पिटाळून घेणारे या पोलीस स्टेशन चे ए पी आय प्रशांत पाटील साहेब आपल्यात हिंमत असेल तर "त्या" देशी आणि किरकोळ दुकानावर कारवाई  करा? अशी मागणी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

          शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना खुद्द जिल्हा पोलिस प्रमुख आणि डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित असणाऱ्या तेजस्विनी सातपुते यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना दिल्या आहेत.मात्र करकंब पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना मात्र याचे सोयर सुतक नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. अधिकारी आणि पोलीस मात्र आपल्याच तोऱ्यात असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

          करकंब ग्रामीण रुग्णालयात अनेक नागरिक कोरोना लसीकरणासाठी येतात,मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे.खुद्द पाटील साहेबांनी या लसीकरणास भेट दिली मात्र "साहेबांनी "लोकांना कोरोना नियमाची जाणीव करून देण्याची तसदी ही घेतली नसल्याचे लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.ग्रामपंचायत,महसूल कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी कोरोनाची जनजागृती करण्यासाठी एका बाजूनी प्रयत्न करीत असताना पोलीस मात्र कागदावर दाखविण्यापुरती कारवाई करण्यात मग्न आहेत.पण कोरोना नियमाची पायमल्ली करणारे,आणि खुलेआम देशी दारू,गुटखा विक्री करणाऱ्यावर ना पोलिसांचा वचक,ना अन्न औषध प्रशासनाची कारवाई ना राज्य उत्पादक विभागाची कारवाई ,त्यामुळे सर्व सामान्य नागरिक मात्र भयभीत वातावरणात जीवन जगत आहे. करकंब मधील वाढत्या कोरोना संख्येला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसावी, अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments