सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1537 कोरोना पॉझिटिव्ह,1327 झाले बरे, तर 40 मृत्यू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे सोमवारी सोलापूर शहरात 217 नवे रुग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1320 नवे रुग्ण आढळून आले असून शहर आणि ग्रामीण भागात काल एका दिवसात 1537 नवे रुग्ण आढळले आहेत.
सोमवारी सोलापूर शहरात 1545 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 217 पॉझिटिव्ह आहेत तर 1328 निगेटिव्ह आले आहेत. आता शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 24345 झाली आहे.
काल शहरात तब्बल 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शहरात आतापर्यंत 1072 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 19789 जण घरी परतले आहेत. तर 3484 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी ग्रामीण भागातील 6129 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 1320 पॉझिटिव्ह आहेत तर 4809 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 68056 झाली आहे.
काल तब्बल 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1549 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 56057 जण घरी परतले आहेत. तर 10451 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments