Hot Posts

6/recent/ticker-posts

कामती बु.येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला..

 कामती बु.येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला..

 कामती  (कटुसत्य वृत्त ) :-  कै.स.मा.ब देशमुख कामती बु.येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून श्रीमती.पुदे मॅडम होत्या.तर प्रमुख निमंत्रण उपस्थिती म्हणुन कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.अंकुश माने हे होते मुख्याध्यापक एस.पी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.

  या प्रसंगी निर्भया पथकाच्या वतीने महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी महामुनी यांनी मुलींची स्वयंसंरक्षण जागरूकता अन्यायाचा बीमोड कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी आदर्श महिलांनाच्या कार्याचा वसा कसा जपावा याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य पाटील सर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.प्रमोद कोरे सर यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments