Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान...मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन

लऊळ  (कटुसत्य वृत्त ) :-  जागतिक महिला दिनाच्या निमित्त लऊळ ता माढा येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महीलांचा सन्मान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन तनिष्का गट व महीला बचत गटाच्या वतीने सरपंच पुजा बोडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माढा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव नलवडे, डॉ.रोहीत बोबडे,उपसरपंच संजय लोकरे, डॉ.प्रदीप पाटील,पत्रकार वसंत कांबळे, डॉ.सावरे,नूतन ग्रामपंचायत सदस्य शांताबाई घुगे,दिपाली मांदे,रुपाली जानराव,यशश्री गांधले,आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत च्या १७ सदस्या पैकी ११ महीला सदस्य असल्याने गावाने पन्नास टक्के पेक्षा जास्त महीला सदस्य असल्याने आमच्या गावाने महीलांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले असुन गावावर महीला राज निर्माण केले असल्याचे मनोगत प्रतापराव नलवडे यांनी व्यक्त केले.
यावेळी यशश्री कांबळे,यशांजली  कांबळे,या लहान मुलींनी भाषण केले व सुचिता गायकवाड,सुजाता जानराव,विजया बोंगाने,काजोल कांबळे,डॉ.रोहीत बोबडे, सरपंच पुजा बोडके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बॅकींग क्षेत्रातील रोहीणी संतोष गवळी, राजकीय क्षेत्रात सलग तीन वेळा निवडून आल्या बद्दल शांताबाई गोरख घुगे, पार्लर क्षेत्रात अनिता अच्युत वेळेकर, वैद्यकीय क्षेत्रात पुजा प्रभाकर जानराव,पाककला क्षेत्रात शुभदा रामचंद्र वाळुजकर, कराटे क्षेत्रात शितल आप्पासाहेब लोकरे,या कर्तृत्ववान महीलांचा सन्मान व उपस्थित महिला ग्रामपंचायत सदस्यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी महीलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.यामध्ये पन्नास महीलांनी सहभाग नोंदवला.
यासाठी तनिष्का गट, यशस्विनी महीला बचत गट, प्रगती महीला सोसायटी,रमाई महीला बचत गट,प्रगती महीला बचत गट या गटाच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य यांनी परीश्रम घेतले.
या क्रार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली नलवडे, सुत्रसंचलन सुजाता माळी,आभार ममता गावडे यांनी मानले. काजोल कांबळे, अश्विनी खुणे,सुचिता गायकवाड,व बचत गटाच्या सर्व गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments