मराठा सेवा संघ माढा तालुका कार्याध्यक्षपदी गवळी , उपाध्यक्ष पदी मिटकल,जगताप शहराध्यक्षपदी महिंगडे
कुर्डुवाडी (कटुसत्य वृत्त ) :- मराठा सेवा संघाच्या माढा तालुका कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी मराठा सेवा संघाच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी राम मिटकल, अरूण जगताप यांची तर तालुका कार्याध्यक्षपदी शिवाजी गवळी, कुर्डूवाडी शहराध्यक्षपदी सचिन महिंगडे यांची सर्वानुमते निवड जाहीर केली. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, माजी तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे , तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, जिल्हा संघटक प्रदिप पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुस्तके देऊन नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वराज्याची स्थापना आणि संत तुकोबारायांचे विचार :एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून पी.एच.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल कुर्डूवाडीतील के.एन.भिसे महाविद्यालयातील प्राध्यापक महादेव थोरात यांचा व इंडिया इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'भारत ज्योती' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दिनेश जगदाळे यांचा सत्कार मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आला.निवडीनंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, करमाळा तालुका सचिव गणेश डोके यांनी तसेच माजी सैनिक संघटनेच्या वतीने सचिव अरूण जगताप व विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तालुका संघटक पत्रकार महेश देशमुख यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.
0 Comments