आ. दिपक साळुंखे पाटील यांनी सपत्नीक घेतली कोरोनाची लस
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आबांचे नागरिकांना आवाहन
सांगोला (कटुसत्य वृत्त ) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. दिपक साळुंखे-पाटील यांनी सोमवार दि 15 मार्च रोजी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सपत्नीक कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी लस घेण्यापूर्वी दिपक साळुंखे-पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा येथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच आरोग्य केंद्राची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण सांगोला तालुक्यात आढळल्याने सांगोल्यात कोरोना या आजाराने येथील नागरिकांना चांगलेच त्रस्त केले होते. दरम्यान शासकीय धोरणे आणि प्रशासकीय अंमलबजावणीमुळे तालुक्यातील कोरोना नियंत्रणात येण्यास मदत झाली. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शासनाने घालून दिलेले सर्व निर्बंध पाळत सांगोला तालुक्यातील गोरगरीब नागरिक व गरजूंना कोट्यावधी रुपयांचे मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. दिपक साळुंखे पाटील यांनी संपूर्ण राज्यभरात नवीन आदर्श घालून देत सामाजिक बांधिलकी जोपासली होती. तसेच तालुक्यातील हजारो नागरिकांना रोगप्रतिबंधक शक्ती वाढावी म्हणुन भारत सरकारने प्रमाणित केलेल्या लाखो रुपयांच्या आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप केले होते. दरम्यान मा. आ. दिपक साळुंखे पाटील यांनी कोरोना काळात केलेली मदत नागरिकांना शासकीय निर्बंध पाळण्याचे केलेले आवाहन आणि प्रशासकीय उपाययोजना यामुळे सांगोला तालुक्यात कोरोनाला आळा घालण्यात यश मिळाले. सध्या कोरोना या आजारावर लस उपलब्ध झाल्याने नुकतीच म्हणजे सोमवार दि 15 मार्च रोजी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन लॉकडाऊन काळात निरपेक्ष भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या आ. दिपक साळुंखे पाटील यांनी आपल्या पत्नीसह या लसीचा पहिला डोस घेतला. आणि तेथील अन्य रुग्णांची विचारपूस केली.
तालुक्यातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक असलेली लस घ्यावी असे आवाहन यावेळी आ. दिपक साळुंखे पाटील यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

No comments:
Post a Comment