भाजपचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा भाजपा तालुकाध्यक्ष - योगेश बोबडे.
अटकेपार झेंडा ग्रुप च्या वतीने नुतन पदाधिकार्यांचा सत्कार
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त ) :- गावच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावचा विकास करून सर्वसामान्यांच्या अडचणी ला धावून जात त्यांचे प्रश्न सोडवावेत ,सध्या माढा तालुक्यात भाजपची चांगली फळी तयार झाली असून ,भविष्यात सत्ता मिळवायची असेल तर आत्तापासूनच नवीन कार्यकर्त्यांनी भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्याची गरज असल्याचे , प्रतिपादन भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी केले .
टेंभूर्णी ता. माढा येथे अटकेपार झेंडा ग्रुप च्या वतीने आयोजित चव्हाणवाडी व नगोर्ली ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच तसेच भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . टेंभुर्णी चे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक व दयानंद महाडिक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सत्कारमुर्ती चव्हाणवाडी सुनिल मिस्कीन सरपंच,बाळासाहेब मोटे उपसरपंच,तसेच ग्रा पं सदस्य हनुमंत चव्हाण, नवनाथ शिंदे ,रमेश नांगरे ,अर्जुन सलगर ,अशोक मिस्कीन, सचिन चव्हाण ,नवनाथ नांगरे ,
नगोर्ली सुनिल भानवसे सरपंच,सोमनाथ ढवळे-पाटील उपसरपंच,ग्रा पं सदस्य विक्रम महाडिक, नवनाथ महाडिक देशमुख , भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी बाळासाहेब ढगे ,यांची भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष पदी सुरेश पाटील यांची,भारतीय जनता पार्टी माढा तालुका सरचिटणीस पदी गिरीशकुमार ताबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ , इंदापूर तालुक्याचे नेते अमरसिंह जगदाळे ,नानासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक देशमुख, दयानंद महाडिक देशमुख , संजय देशमुख ,किशोर नाळे, हरि सटाले ,विजयकुमार कोकाटे ,अनिल पाटील ,संदीप देशमुख ,संग्राम देशमुख, पांडुरंग महाडिक, अविनाश धोञे ,सुधीर पाटील, बाबा महाडिक, नागनाथ चांदगुडे , दत्ता जाधव तेजस निंबाळकर , जयराम महाडिक, तुषार देशमुख,गणेश देशमुख ,पप्पु देशमुख, मारुती मिस्कीन, योगेश खडके ,योगेश भोसले , आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक भाऊसाहेब महाडिक देशमुख यांनी केले. यावेळी नवनाथ नांगरे, हनुमंत चव्हाण ,जयवंत पोळ, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुञसंचलन व आभार राजा पाटील यांनी केले.

No comments:
Post a Comment