महिला दिनानिमित्त वैष्णवी महामुनी हिला अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल (भारतीय महाक्रांती चित्रपट सेना यांचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार )
मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवाशी असलेल्या इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत अभिनयाचे धडे घेत अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडून उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्रातील मनाचा समाजाला जाणारा बाल कलाकार हा पुरस्कार मिळून संपूर्ण गावाचे नाव महाराष्ट्रात गाजवलेल्या वैष्णवी महामुनी हिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशी भावना गावकऱ्यांडून बोलले जात आहे.
जगामध्ये वाढदिवसाचे चालू असलेले विदूरूपीकरण याच्यावर भाष्य करणारी हैप्पी वाला बड्डे या शॉर्ट फिल्म मध्ये केलेल्या अभिनयातून कलाक्षेत्रात वेगळा ठसा निर्माण करून लहान वयातच आपल्या कलेची चुणूक दाखवत राज्य स्तरीय पुरस्कार मिळवणारी सोलापूर जिल्यातील पहिली बाल कलाकार होण्याचा मान वैष्णवी महामुनी हिने मिळवला आहे.त्या बद्दल संपूर्ण गावातून तिचे कौतुक होत आहे.याच्या पुढेही अशीच अभिनय क्षेत्रात याच्या पेक्षाही चांगले कार्य करून लोकांचे मनोरंजना बरोबरच सामाजिक विषय घेऊन समाजाच्या समस्या वाचा फोडण्याचे कार्य करावे अशी भावना वडील नाट्य /सिने अभिनेते अमोल महामुनी यांनी व्यक्त केली.
0 Comments