प्रभाग 14 मध्ये अद्यावत स्ट्रीटलाईटची उभारणी करा
क्रांती नगर,समर्थ नगर परिसरातील विद्युत सुविधाबाबत लखन कोळी आक्रमक , सहाय्यक अभियंत्यांना दिले विविध मागण्यांचे पत्र

मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील क्रांति नगर आणि समर्थनगर मधील अनेक नागरिकांना महावितरण विभागाच्या प्रलंबित कामामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रभाग चौदा आणि प्रभाग पंधरा मध्ये अनेक नागरिकांना विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे या प्रभागातील विविध समस्यांचे निवारण करून महावितरणने सर्व प्रभागवासीयांना दिलासा द्यावा. अशी मागणी प्रभाग क्रमांक 14 मधील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि या प्रभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार लखन कोळी यांनी केली आहे.
मोहोळ महावितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनामध्ये लखन कोळी यांनी विविध समस्या अत्यंत पोटतिडकीने मांडले आहेत. प्रभाग 14 आणि 15 मध्ये असलेल्या बेबाबाई तूपसमिंदर यांच्या घरालगत विद्युत पोलचा ताण आहे. त्या ठिकाणी अद्ययावत विद्युत पोल उभा करण्यात यावा. आणि सदर विद्युत पोलला असणारा ताण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना अडथळा होत आहे. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडून येत्या काळात जीवित हानी देखील होऊ शकते. या ताणाचा त्रास अनेक वाहनांना होत असल्यामुळे या भागात चार चाकी वाहने येऊ शकत नाहीत. त्यामुळे सदरचा विद्युत पोलचा ताण त्वरित काढण्यात यावा अशी मागणी लखन कोळी यांनी केली.
गावडे यांच्या घराजवळ असणारा सिमेंट विद्युत पोल हा क्रॅक झाला आहे. त्यामुळे सदरचा पोल कधीही कोसळू शकतो आणि तारा जमिनीवर पडून मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे सदर क्रॅक गेलेला विद्युत पोल काढून सदर ठिकाणी अद्ययावत चांगला पोल त्वरित उभारण्यात यावा. त्याचबरोबर क्रांतीनगर लगत असणाऱ्या महावितरण मोहोळ ते अनगर 33 केव्ही तारा जमिनीलगत आलेल्या आहेत. त्यामुळे त्या तारा खालून जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला कधीही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या तारा त्वरित जमिनीपासून आवश्यक त्या उंचीवर पूर्वस्थितीत करण्यात येऊन येत्या काळात होणारी दुर्घटना टाळावी. त्याचबरोबर लोकवस्तीमध्ये तारा ऐवजी केबल टाकण्यात यावी.रात्री-अपरात्री बस स्थानकावरून रेल्वे स्टेशन वरून येणाऱ्या प्रभागातील नागरिकांना घराकडे जाताना अंधाराच्या साम्राज्याचा सामना करावा लागतो.त्यामुळे प्रभाग क्रमांक 14 समोर असलेल्या विजापूर महामार्गालगत नवीन अद्यावत स्ट्रीटलाइट मंजूर करून पथदिवे लावण्यात यावे.
लखन कोळी
युवा सामाजिक कार्यकर्ते
तथा इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 14
0 Comments