कृषी पंपाचे वीजबील भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे : नगरसेवक आनंदा माने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

कृषी पंपाचे वीजबील भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे : नगरसेवक आनंदा माने

 कृषी पंपाचे वीजबील भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे : नगरसेवक आनंदा माने

विजेच्या संदर्भातील कामे मार्गी लावण्यासाठी विज बिल भरणा करावा


सांगोला  (कटुसत्य वृत्त ) :-  सांगोला शहरातील कृषी पंपाचे वीजबील सुमारे 11 कोटी 90 लाख रू. थकीत असून नागरिकांनी योग्य सोयीसुविधेचा फायदा घेण्यासाठी हे वीज बिल भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांनी केले आहे.
सांगोला शहरामध्ये एकूण 1513 शेती पंप वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांचे वीज बिल सुमारे 11 कोटी 90 लाख रू. थकीत आहे. यामध्ये व्याज व दंड वजा मूळ थकबाकी निव्वळ 9 कोटी 08 लाख रू. आहे. यापैकी 30 ग्राहकांनी सुमारे 6 लाख 53 हजार रू. विजबिल भरल्यामुळे त्यांना जवळपास 5 लाख 73 हजार रू. सूट देण्यात आली आहे. यामुळे सांगोला शाखेस सुमारे 2 लाख 24 हजार रू. मंजूर झाले असून यामध्ये वीजेच्या संदर्भातील कामे मार्गी लावली जाणार आहेत.
कृषी पंप वीज धोरण 2020 नुसार मार्च 2021-22 पर्यंत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांस 50 टक्के, मार्च 2023 पर्यंत 30 टक्के आणि मार्च 2024 पर्यंत बील भरणाऱ्या ग्राहकांस 20 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. त्यामुळे या सुवर्णसंधी फायदा सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे, असेही आनंदा माने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages