कृषी आणि औद्योगिक विकासाला दिशा देणारा तसेच राज्यातील सामान्य जनतेचे हित जपणारा व राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

कृषी आणि औद्योगिक विकासाला दिशा देणारा तसेच राज्यातील सामान्य जनतेचे हित जपणारा व राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प.!

 कृषी आणि औद्योगिक विकासाला दिशा देणारा , राज्यातील सामान्य जनतेचे हित जपणारा व राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प.! 

अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे त्रिवार हार्दिक अभिनंदन

मुंबई  (कटुसत्य वृत्त ) :-    गतवर्षी आलेली कोरोनाची महामारी आणि यामुळे देशभर झालेल्या लॉकडाऊनमुळे कृषी आणि उद्योगक्षेत्र पूर्णतः उध्वस्त झाले होते. परंतु महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री पवार यांनी कृषी, उद्योग,सहकार,रस्ते, रेल्वे,धार्मिक स्थळे, वाहतूक या सर्वांना भरभरून सोयी सवलती देऊन महाराष्ट्रातील ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक अशा समाजातील सर्व स्तरातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत 0% व्याजदराने कर्ज देण्याची घोषणा करून दिलासा आणि धीर दिला आहे. तसेच आज जागतिक महिला दिनी राज्यातील माय-भगिनींना केवळ शुभेच्छा न देत महिलांच्या व मुलींच्या विकासाच्या अनेक योजना जाहीर करून खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान केला आहे या अर्थसंकल्पामुळे कोलमडून गेलेल्या उद्योग व्यवसायालाही चालना मिळण्यास विशेष मदत होईल.राज्यातील सर्व क्षेत्रांचा आणि सर्व घटकांच्या हिताचा विचार करणारा हा अर्थसंकल्प निश्चितच स्वागतार्ह आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्याच्या उभारणीत पवार यांनी  सिंहाचा वाटा उचलला आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश या सर्वच विभागांना समान न्याय देण्याचा दादांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच समाजातील सर्व घटकांचे हीत जपणारा व देशात राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे.  आपल्या विचारांच्या विकासाचा वेग असाच राज्याला प्रगतीपथावर घेऊन जावो आणि आपल्या हातून महाराष्ट्रातील जनतेची अशीच प्रामाणिक सेवा घडो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.

मा. आम. दिपक साळुंखे पाटील
प्रदेश उपाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages