Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील मुक्कामी व रेगुलर एस टी बसेस तात्काळ चालू करा - विद्यार्थी सेनेची मागणी.

 मोहोळ तालुक्यातील मुक्कामी व रेगुलर एस टी बसेस तात्काळ चालू करा - विद्यार्थी सेनेची मागणी.




मोहोळ (कटूसत्य वृत्त ):-विद्यार्थी सेना मोहोळ तालुका यांच्या वतीने एस.टी वाहतूक नियंत्रण मोहोळ यांना निवेदन देण्यात आले. मोहोळ तालुक्यातील कुरूल, सय्यद वरवडे, वटवटे, सौंदणे, देगाव (वा) ह्या गावातील व मोहोळ तालुक्‍यातील अनेक मुक्कामी व रेगुलर एस.टी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना रोगामुळे परिवहन प्रशासनाने मोहोळ तालुक्यातील काही प्रमाणात एसटी बसेस बंद केल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सदर एस.टी बंद केल्याने मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. व तालुक्यातील नागरिकांना, शेतकऱ्यांना येणे जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. ह्याबाबत नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या अनेक वेळा तक्रारी आल्या, त्यानुसार मोहोळ तालुक्यातील परिवहन एसटी बसेस लवकरात लवकर चालू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी सेना मोहोळ तालुका यांच्या वतीने करण्यात आली. व मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख यांनी यावेळी दिला.
यावेळी विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हाप्रमुख  हर्षल देशमुख, विद्यार्थी सेना  तालुका प्रमुख दादाराजे बेलदर, समाधान वाघमोडे, विजय महाडिक, तानाजी शिंदे, आदी उपस्थित होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आमचे पदाधिकारी तालुका प्रमुख दादाराजे बेलदार व समाधान वाघमोडे यांच्या कडे तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत सदर निवेदनाद्वारे उपविभागीय परिवहन अधिकारी सोलापूर यांच्याकडे मोहोळ तालुक्यातील परिवहन बसेस  तात्काळ चालू करण्याची मागणी मोहोळ कंट्रोलद्वारे करण्यात आली. व मागणी मान्य न झाल्यास योग्यवेळी आंदोलनही करू.
हर्षल ब्रह्मदेव देशमुख
 जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना सोलापूर
Reactions

Post a Comment

0 Comments