Hot Posts

6/recent/ticker-posts

येत्या महिनाभरात वाजणार मोहोळसह नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुलनिवडणुकीसाठीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 येत्या महिनाभरात वाजणार मोहोळसह नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुलनिवडणुकीसाठीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

१९ एप्रिल याद्या प्रसिद्ध करण्याचा दिवस
तर २९ एप्रिल पर्यंत घेता येणार हरकती

मोहोळ (कटूसत्य वृत्त ):-येत्या आठ मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ माढा आणि माळशिरस नगर परिषदांच्या कालावधीची मुदत संपणार आहे. सध्या करोना महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राज्य शासनाने याबाबत ठराव मंत्रीमंडळात घेऊन करोनामुळे राज्यातील यापूर्वीच मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रशासकांची मुदत वाढवण्याची निर्णय घेतला होता. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने मे मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांच्या मतदार याद्यांच्या निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे येत्या महिनाभरातच राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल पुढील महीन्यात वाजू शकते. त्यामुळे गेले पंधरा दिवसापासून शांत असलेले नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आता अजून तापणार आहे हे आता जाणवत आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत अद्यावत विधानसभेची मतदार यादी उपरोक्त नगरपरिषदा या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदार यादीच्या आधारे मतदारांची विभाजन करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदार यादी ग्राह्य धरून या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठीच्या मतदारयादी च्या कार्यक्रमा नुसार दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तर सदर प्रारुप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी १९ एप्रिल २०२१ ते २९ एप्रिल २०२१ असा दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे. तर प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अती प्रमाणित करून प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करून मतदान केंद्र निहाय मतदार याद्या अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्याबाबत यानंतर स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. प्रारुप प्रभाग निहाय मतदार यादी तयार करताना अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक सूचना आयोगाने दिले असून विधानसभा मतदार यादी संबंधित नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट नसलेल्या मतदारांची संख्या आणि नगर परिषद निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप यादीतील मतदारांची संख्या समान असणे आवश्यक बाब असणार आहे. तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित प्रभागातील सर्व मतदार प्रारुप मतदार यादीतील समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अथवा प्रभागाच्या बाहेर मतदार त्यामध्ये समाविष्ट झाली नाहीत याची खात्री करण्याची सूचना देखील आयोगाने केली आहे.
चौकट
येत्या मे महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुक २०२१ साठीच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काल जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी या  मतदार यादीच्या कार्यक्रमाची शिस्तबद्ध अंमलबजावणी सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकार्‍यांनी त्याच बरोबर राज्य निवडणूक आयोगातील सर्व विभागांनी करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ माढा आणि माळशिरस नगर परिषदेच्या सदस्य पदांच्या निवडणुकीसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनाचा प्रथम टप्पा पूर्ण केला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तर पुढील महिन्यात निवडणुका जाहीर होऊन तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments